अमळनेर(प्रतिनिधी) वाहनातून बैलांची विना परवाना कोंबून वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह दोन बैल असा १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,२७ रोजी दुपारी ४ ते ६ च्या दरम्यान प्रताप महाविद्यालयाच्या उड्डाणपुलाकडुन भद्रा प्रतीक मॉल कडे येणारे टाटा कम्पनीचे छोटा हत्ती वाहन (एम एच १८ ए ए २०३९) थांबवले असता वाहनात प्रत्येकी ३० हजार रुपये किंमतीचे २ बैल दाटीवाटीने बांधलेले होते. चालक शाहरुख खा.करीम खा.पठाण (वय २५, रा.कळमसरे ता.अमळनेर) याची विचारपूस केली असता ते बैल पारोळा येथील शेख इम्रान शेख गुफरान यांचे असल्याचे त्याने सांगितले. मात्र चालकाकडे गुरे वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसल्याने तसेच गुरे दाटीवाटीने बांधून ठेवल्याने ६० हजारांचे बैल व १ लाख २० हजारांचे वाहन असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. चालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेची वागणूक प्रतिबंधक अधिनियन १९६० च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेकॉ अशोक साळुंखे करत आहेत.