खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सारबेटे खुर्द येथील सार्वजनिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला “गोतावळा मैत्रीचा”

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे खुर्द येथील सार्वजनिक विद्यालयाच्या सन- १९९७-९८ या वर्षाच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा “गोतावळा मैत्रीचा” हा स्नेह-समेलन सोहळा उत्साहात पार पडला. यात सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला

 या प्रसंगी दहावीचे वर्ग शिक्षक ए.डी.पाटील हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे.डी. अहिरे होते.या कार्यक्रमात ‘सन्मानमूर्ती’ म्हणून दहावीचे त्या वेळचे सर्व विषय शिक्षक अनुक्रमे व्ही.एच. पाटील,पी. के. निकुंभ,पी.आर.पवार हे उपस्थित होते. त्याचसोबत आज सेवेत असलेले आणि या बॅचला पाचवी-सहावी चे  शिक्षकवृंद एस.जी.पवार,पी.एस. सोनवणे आदी हे उपस्थित होते. तसेच शाळेचे चेअरमन राजेश एन पाटील तसेच सध्या शाळेत शिकवत असलेले  भूषण निकम व सूर्यकांत निकम त्याचप्रमाणे सर्व शिक्षकेतर कर्मचारी व संचालक सुभाष पाटील उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विविध खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. या कार्यक्रमांचे नियोजन कार्यक्रम प्रमुख विजयसिंह पाटील व त्यांचे सहकारी मित्र मैत्रिणींनी मिळून केले. सुत्रसंचालन अॅड.  नुतन कैलास पाटील यांनी केले तर आभार निलेश पांडूरंग पाटील यांनी मानले. संध्या राजु पाटील, भगवान पाटील, संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी नुतन कैलास पाटील, अनिल लटकन ब्रम्हे, शरद बापू पाटील, सुवर्णा योगेश पाटील, विजया अरुण पाटील, विजय भिमा घोलप,संदिप किसन पाटील,प्रदीप नवल पाटील,श्रावण कोळी, रतिलाल अजमल राठोड,जगदीश पाटील,गणेश पांडुरंग पाटील,राजेंद्र दिनकर पाटील,कृष्णा भास्कर पाटील, संगिता गणेश पाटील, दीपक साहेबराव पाटील,संदिप दिलीप पाटील,सौ. रत्ना गणेश पाटील,अविनाश अशोक पाटील, निलेश पांडुरंग पाटील,विजयसिंग दामू पाटील,विश्वास काळे,संतोष भिला जाधव, सचिन मधुकर पाटील, गणेश गुलाबराव पाटील,दशरथ रमेश सूर्यवंशी,परशुराम राठोड, संध्या राजू पाटील, मच्छिंद्र विनायक पाटील, प्रदीप एकनाथ पाटील,जयेश भानुदास पाटील,भुषण विजय पाटील, विश्वनाथ शांताराम पाटील, अनिता ईश्वरलाल पाटील, शरद मरलीधर पाटील, तुषार युवराज पाटील, अनिल मधुकर पाटील,योगेश भानुदास पाटील, दीपक सुरेश पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्रीती भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button