अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे दवाखान्यात जावून येतो असे सांगून गेलेला तालुक्यातील चौबारी येथील ६५ वर्षीय व्यक्ती आजपावेतो परत न आल्याने मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती अशी की, चौबारी येथील आनंदा अवचित पाटील (वय ६५) हे दिनांक २४ मे रोजी सकाळी अकरा वाजता अमळनेर येथे दवाखान्यात जावून येतो असे सांगून निघाले. मात्र सायंकाळ झाली तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र आजपावेतो कोणताच तपास न लागल्याने त्यांच्या मुलाने मारवड पोलिसांत हरविल्याची फिर्याद दिली असून पुढील तपास हे कॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.