अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७३० पोलीस कर्मचाऱ्यांचा भव्य रूट मार्च अमळनेर शहरातून काढण्यात आला.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे , शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,अक्षदा इंगळे, विनोद पाटील , नामदेव बोरकर, सिद्धांत शिसोदे, मिलिंद बोरसे यांच्यासह १८ अधिकारी ,अमळनेर उपविभागाचे ९२ अंमलदार , अकोला विभागाचे २५० पोलीस , जळगाव मुख्यालयाचे २२ पोलीस , धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे ६० पोलीस, जळगाव येथील १६० होमगार्ड , धुळे येथील १०० होमगार्ड , केंद्रीय पथकाचे आठ पथके असे सुमारे ७३० कर्मचाऱ्यांनी गांधलीपुरा पोलीस चौकीपासून रूट मार्च काढला. राणी लक्ष्मीबाई चौक, सराफ बाजार, वाडी चौक कसाली मोहल्ला , झामी चौक , पवन चौक, तिरंगा चौक, पाच पावली देवी मंदिर मार्गे रूट मार्च चे विसर्जन करण्यात आले.