अमळनेर (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्राच्या जागेचे भूमीपूजन २६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केलेले आहे. गलवाडे रोड, गंगा एक्वाशेजारी ब्रह्माकुमारी विद्यालयास मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम, राजयोग ध्यानाभ्यास आदी आध्यात्मिक कामासाठी जागा मिळालेले असून याचे भूमीपूजन आयोजित करण्यात आलेले आहे. जगभरातील सर्वात मोठी आध्यात्मिक शिक्षण संस्था म्हणून ब्रह्माकुमारीज्चे कार्य सर्वश्रुत आहे. अवगुणमुक्त, व्यसनमुक्त आणि मूल्याधिष्ठीत समाजनिर्मितीसाठी अमळनेर सेवाकेंद्रामार्फत अनेकाविध उपक्रम राबविले जात आहेत. नवीन जागेत ते अधिकाधिक प्रभावी आणि विस्तृत स्वरुपात राबविले जातील असे ब्र.कु. विद्यादीदी यांनी सांगितले. भूमीपूजन राजयोगीनी ब्रह्माकुमारी संतोषदीदी, संयुक्त प्रशासिका, ब्रह्माकुमारीज् माऊंट आबू आणि निदेर्शिका, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, राजयोगीनी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजी, निर्देशिका, ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्र यांच्या पावन हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मंत्री अनिल भाईदास पाटील, खासदार उन्मेश पाटील उपस्थित असतील. माजीआमदार स्मिताताई वाघ, बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, साहेबराव पाटिल, डॉ. अनिल शिंदे, ब्र.कु. मधुकरभाई सोनार, वरीष्ठ राजयोगी, जळगाव श्री. धिरज सोनी, उद्योजक जळगाव प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य मीडिया विंग प्रमुख, जळगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या प्रंसगी माऊंट आबूहून आलेल्या राजयोगीनी संतोषदीदी यांचे प्रेरक विचार श्रवण करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन ब्र.कु. विद्यादीदी, संचालिका अमळनेर सेवाकेंद्र यांनी केले आहे.
Read Next
22 hours ago
करणखेडा येथे तलाठी नियुक्त न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा
23 hours ago
गुलालाची उधळणकरीत ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप
23 hours ago
मिरवणुकीत विघ्न आणणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
23 hours ago
राजे शिवाजी गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद
23 hours ago
मजुरांची भांडे वाटप यंत्रणा कोलमडल्याने महिला तीन दिवसांपासून मुक्कामी
23 hours ago
शांतीदूतांमुळे अमळनेरला यंदा ‘श्रीं’चे झाले विसर्जन शांततेत!
3 days ago
मामाच्या गावाहून घरी येताना मुडी प्र. डांगरी येथील तरुणाने तापी नदीत आत्महत्या
3 days ago
प्रताप कॉलेजात अमळनेर तालुका कुस्तीगीर संघची निवड चाचणी स्पर्धा रंगली
3 days ago
गणेश विसर्जन मिरवणूक मिरवणुकीवर हॅन्डी कॅमेरे आणि दोन ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर
3 days ago
महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा मानद अध्यक्षपदी विजय माळी यांची निवड
Related Articles
Check Also
Close