अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून बिनविरोध निवडणुकीची परंपरा अबाधित राहिली आहे. पडली.यात एकूण ११ संचालक बिनविरोध निवडुन आले आहेत. या संचालकांचे स्वागत करण्यात येत आहे
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक पतसंस्थेची (२०२४-२०२९ ) पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून एस.पी.महाजन यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खा.शि.मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,जी.एस.हायस्कूल चे मुख्याध्यापक बी.एस.पाटील,द्रो.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, प्रताप हायस्कूल च्या मुख्याध्यापिका प्रमोदीनी पाटील,प्राथमिक च्या मुख्याध्यापिका एस.पी.सिसोदे व कैलास पाटील तसेच खा.शि.मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांचे सर्व पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडण्यास मदत झाली.
बिनविरोध निवडून आलेले संचालक असे
पतसंस्थेत एकूण ११ संचालक बिनविरोध निवडुन आले आहेत. यात सर्वसाधारण मतदारसंघातून आर.जे.पाटील,राहुल जगतराव पाटील,बाविस्कर कैलास राजधर,पालवे दिनेश नामदेव,पाटील मनोहर गुलाबराव,पाटील लक्ष्मण नथ्थू,महिला मतदारसंघातून पाटील वैशाली जितेंद्र,भालेराव जयश्री सुरेश,इतर मागासवर्गीय मतदारसंघातुन सनेर किरण प्रकाश,अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातुन बत्तीसे संजय गंभीर तर वि.जा.भ.ज मतदारसंघातुन कंखरे चंद्रकांत सदाशिव बिनविरोध निवडून आले आहेत.सर्वसाधारण मतदारसंघातुन प्रशांत पवार यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.