प्रताप महाविद्यालयात आंतर विभागीय ज्युडो स्पर्धा रंगल्या

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज इनडोअर हॉलमध्ये आंतर विभागीय ज्युडो स्पर्धा झाल्या. यात  क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार आणि एरंडोल अश्या ४ विभागतील ज्युडो संघ उपस्थित होते. यात जिंकलेल्या खेळाडू हे पुढील स्पर्धेसाठी विद्यापीठाचे नेतृत्व करतील.

उदघाटन प्रसंगी खा. शी. मंडळाचे  कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, प्राचार्य. अरुण जैन, एरंडोल विभाग सचिव डॉ. विजय पाटील, निवड समिती सदस्य डॉ. किशोर वाघ, डॉ. देवेंद्र धाकडं, प्रा. उमेश पाटील,डॉ. भालचंद्र मोरे,डॉ. शैलेश पाटील, डॉ. संजय भावसार , डॉ. अशोक भदाणे ,डॉ. महेश पाटील, प्रा. खुशाल देशमुख, आमचे तरुण तडफदार जिमखाना प्रमुख डॉ. संदीप नेरकर, डॉ.एस. डी.बागुल , डॉ.कैलास निळे, डॉ. किरण गावित,पंच म्हणून स्वप्नील सर नाशिक येथून आले होते.सूत्रसंचालन डॉ. योगेश तोरवणे यांनी केले. सर्व स्पर्धा आयोजन नियोजन डॉ. सचिन पाटील, प्रा.अमृत अग्रवाल, प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रशांत देवकाते, प्रशिक्षक सचिन वाघ, जयेश जगताप, यज्ञेश जगताप, लोकेश साळुंखे, तसेच मदतीला वृषाली पाटील, वैष्णवी पाटील, जयेश पाटील, साहिल टकरी,आणि खेळाडू उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *