🔴 जलसंपदा विभाग:
19 डिसेंबर 2023 चालू घडामोडी
प्रश्न – नुकताच ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 14 डिसेंबर
प्रश्न – 2023 मध्ये गुगलच्या टॉप ट्रेंडिंग ऍथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे?
उत्तर – शुभमन गिल
प्रश्न – अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल कोण आहे?
उत्तर – महाराष्ट्र
प्रश्न – तामिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर – फ्रान्स
प्रश्न – अलीकडेच PFRDA बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – परम सेन
प्रश्न – नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सरच्या 2023 गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर – हैदराबाद
प्रश्न – 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनेलमध्ये अलीकडे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर – नितीन साहनी
प्रश्न – कोणते राज्य सरकार अलीकडे सर्व जिल्ह्यांमध्ये पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे?
उत्तर – मध्य प्रदेश
प्रश्न – FIH हॉकी अवॉर्ड्स ज्युनियर वर्ल्ड कप 2023 नुकताच कोणत्या शहरात पार पडला?
उत्तर – क्वालालंपूर
✍🏻️राज्य महिला आयोगाचे अधिकार.
१) महाराष्ट्र राज्य आयोग ही वैधानिक संस्था असून, तिला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे
२) एखाद्या खटल्याशी संबंधित कागदपत्रे कोणत्याही सार्वजनिक कार्यालय वा न्यायालयाकडून आयोग मागवू शकतो
३) साक्षीदार आणि कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत आयोग आदेश देऊ शकतो.
४) आयोगाशी संबंधित विषयावर सुनावणीला स्थगिती देण्याचाही अधिकार आयोगाला आहे.
५) महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये एखाद्या राज्य सरकारी वा केंद्र सरकारी अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचाही अधिकार आयोगाला आहे.
✍🏻️राज्य महिला आयोगाची प्रमुख उद्दिष्टे
१) समाजात महिलांचे स्थान आणि प्रतिष्ठा उंचावणे
२) महिलांबाबत होत असलेला अन्याय शोधून काढणे आणि तो दूर करण्यासाठी उपाय सुचवणे.
३) एखादा विद्यमान कायदा महिलांसाठी अन्यायकारक असल्यास त्याबाबत सरकारला सूचना देणे आणि संबंधित कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय सुचवणे.
४) समाजात महिलांचे स्थान आणि प्रतिष्ठा उंचावण्यासाठी राज्य सरकारला योग्य सल्ला देणे
🔷 चालू घडामोडी :- 19 डिसेंबर 2023
◆ चेन्नई येथील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे दर पाच वर्षांनी “संसद महारत्न पुरस्कार” देण्यात येतो.
◆ यावर्षीचा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना(दुसऱ्यांदा) जाहीर झाला आहे.
◆ माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून “संसद महारत्न पुरस्कार” सुरू करण्यात आला आहे.
◆ महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र शासनाच्या “इतर मागास बहुजन कल्याण” विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
◆ महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार “डॉ. तारा भवाळकर” यांना जाहीर करण्यात आला आहे.
◆ महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था अमेरिका देशांतील महाराष्ट्रतील रहिवाशांनी स्थापन केली आहे.
◆ इस्राईल आणि हमास यांच्या मध्ये सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अमसभेत मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने 193 पैकी 153 देशांनी मतदान केले.
◆ इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या मतदानात 23 देशांनी भाग घेतला नाही.
◆ COP-28 हवामान परिषदेत 200 देशांनी जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दुर जाण्याचा द ग्लोबल स्टॉकटेक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
◆ COP-28 हवामान परिषदेत 2050 सालापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य टक्क्यांवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.
◆ COP-28 हवामान परिषदेत जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी “द ग्लोबल स्टॉकटेक” करार करण्यात आला आहे.
◆ भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे अंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट आशिया खंडातील पाहिले टेनिसपटू ठरले आहेत.
◆ अंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम च्या यादीत समावेश होणारा भारत 28वा देश आहे.
◆ महीला राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद “हिमाचल प्रदेश” या संघाने पटकावले आहे.
◆ हिमाचल प्रदेश ने तिसऱ्यांदा महीला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ महीला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने ब्राँझ पदक जिंकले आहे.
◆ रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या राज्याचा वित्तिय व्यवस्थापना बाबत च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचे प्रमाण GDP च्या 18 टक्के आहे.
◆ RBI ने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार राष्ट्रिय पातळीवर कर्जाचे सरासरी प्रमाण GDP च्या 27.6 टक्के आहे.
◆ रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. ते अभिनय क्षेत्राशी संबंधित होते.