खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तरुणींना छेडणाऱ्या एम एस डब्ल्यूच्या तरुणाला पोलिसांनी दिला गणेशोत्सवात ‛प्रसाद ’

जनतेच्या तत्पर सेवेसाठी सुरू केलेल्या डायल ११२ चा होतोय सामाजिक उपयोग

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पोलिसांनी जनतेच्या तत्पर सेवेसाठी सुरू केलेल्या डायल ११२ चा उपयोग केल्याने तरुणींना छेडणाऱ्या एकाला गणेशोत्सवात ‛प्रसाद ’ देण्यात आला तर एकाचे अडीच लाखाचे  हरवलेले ब्रेसलेट परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. अमळनेर तालुक्यातील एका खेड्यावरून येणाऱ्या मुलींचा पाठलाग करून दुसऱ्या खेड्यावरील एम एस डब्ल्यू झालेल्या  तरुणाने छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याने त्या तरुणींना डायल ११२ ची आठवण झाली. त्यांनी ११२ डायल करताच पो नि शिंदे यांच्या आदेशाने निलेश मोरे व गणेश पाटील यांनी बसस्थानकावर धाव घेत त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तरुण मनोरुग्ण असल्याने पोलिसांच्या अंगावर धावून गेला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला नेऊन गणपतीचा ’प्रसाद’ दिला. नंतर त्याच्या पालकांना बोलावून समज देण्यात येऊन त्याला सोडून देण्यात आले.

 

हरवलेले २५ ग्राम सोन्याचे ब्रासलेट मिळवले परत

दुसऱ्या घटनेत सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या हातातील सुमारे दीड लाखाचे २५ ग्राम सोन्याचे ब्रासलेट रस्त्यात पडले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी ११२ च्या पथकाला तात्काळ पाठवले. शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका महाविद्यालयीन तरुणाने ते बेंटेक्स समजून घरी नेले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्या घरून ब्रासलेट ताब्यात घेऊन सुरेश पाटील यांना परत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,निलेश मोरे , महेश पाटील ,प्रवीण पाटील हजर होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button