खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळगाव येथील जवानाने मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वाटप केले शैक्षणिक साहित्य

अमळनेर (प्रतिनिधी) सामाजिक जाणिवेच्या भावनेतून तालुक्यातील अमळगाव येथे सेना दलात कार्यरत जवानाने मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंगणवाडी व जिप शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
श्री सोजीनाथ महाराज सेवा प्रतिष्ठान, अमळगावतर्फे दिनांक १२ ऑगस्ट रोजी जवान उदय हिम्मतराव पाटील यांचे लहान चिरंजीव भावेश उदय पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून पाटी, बालमित्र पुस्तक व बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

तिन्ही भाऊ देश सेवेसाठी तत्पर

मुलाच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविणारे उदय हिम्मतराव पाटील हे भारतीय सेनेत कार्यरत असून त्यांचे भाऊ अधिकार हिम्मतराव पाटील हे भारतीय सेनेत व निलेश हिंमतराव पाटील हे पोलिस दलात कार्यरत असून देशाची सेवा करीत आहेत. तिन्ही बंधू नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असतात व सार्वजनिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button