अमळनेर (प्रतिनिधी) पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद व्हावा या उद्देशाने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत बन्सीलाल पॅलेस येथे पालक- शिक्षक सभा शनिवारी झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे उपस्थित होते. तसेच उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर ,शालेय समितीच्या सदस्या शितिका अग्रवाल व आचल अग्रवाल उपस्थित होते. सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व सर्व उपस्थित पालकांना संबोधित केले .या सभेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक गोष्टींवर चर्चा झाली .यात विविध प्रकारच्या शालेय परीक्षा, गुणवत्ता, स्कॉलरशिप ,गृहकार्य, विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या समस्या व त्यांचे निराकरण, आरोग्य व स्वच्छता, विविध स्पर्धा, आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत कुमार देवरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न आणि पालकांकडून हवे असणारे सहकार्य याविषयी पालकांशी संवाद साधला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले .कार्यक्रमाचे सांगता” वंदे मातरम “गीताने करण्यात आली.
पालकांनी काळानुसार बदलायला हवे
पालकांनी काळानुसार बदलायला हवे तसेच आपल्या मुलांच्या शाळेतील अभ्यासाबाबत वेळोवेळी चौकशी केली पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असे प्रतिपादन शालेय समितीच्या सदस्या सितिका अग्रवाल यांनी केले. पालकांच्या समस्येचे निराकरण व गुणवत्ता वाढ यासाठी प्रयत्न याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर यांनी केले.