अमळनेर (प्रतिनिधी)- अमळनेर येथील भगवा चौक परिसरातील सुशोभीकरण केलेल्या चौकातील गेल्या अडीच वर्षांपासूनअडसर असणारी डी पी आज रोजी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वतः कामात लक्ष घालून तेथील डी पी काढून परिसरातील जनतेला अचानक एक दिवाळी उपहार दिला.
भगवा चौक परिसरातील लोकांची खुप दिवसापासून चौकातील डी पीचे स्थलांतर करण्याची मागणी होती.परंतु अनेक नगराध्यक्ष झाले पण त्या चौकातील राहिवासी असून सुद्धा ते काम त्यांनी केले नाही परंतु कृषिभूषण साहेबराव दादांनी लोकांच्या मागणीचा विचार करून सर्वाना सुखद धक्का दिला.म्हणून परिसरातील नागरिकांनी त्यांचा डी पी जवळच त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व आभार मानले .यावेळी नगरसेवक शाम पाटील,प्रा. रामकृष्ण पाटील, बाबू साळुंखे, संजय पूनाजी पाटील,रणजित पाटील, राजेंद्र देशमुख, उमेश धनराळे, स्वप्नील पाटील,विवेक सूर्यवंशी,सुभाष कदम ,सुनील पाटील,मुन्ना खंडागळे,जितेंद्र देशमुख,सुरेश पाटील,अनिल मांडोळे ,कामगार वर्ग व भगवा चौक मित्र मंडळ आदि उपस्थित होते.