अमळनेर: जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर दाखले ऑनलाइन देणे सुरू झाले असून ऑफलाइन दाखले आजपासून बंद करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी दिली विनाविलंब काही तासातच दाखले मिळणार आहेत
२० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन दाखल्याचे कामकाज करण्यात आले ते यशस्वी झाल्याने यापुढे सर्व जातिचे व नॉनक्रिमीलेयर दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत वेळ , पैसे , श्रम वाचवण्यासाठी ऑनलाईन दाखले देण्यात येत आहेत सुरुवातीला ऑफलाईन दाखले देताना कागदपत्रांच्या झेरॉक्स साठी पैसे लागत होते तसेच ,प्रति चांगल्या येत नसल्याने त्रुटी यायच्या , अनेकदा प्रकरणे खाली वर झाल्याने गहाळ व्हायचे किंवा मागे पुढे क्रमांक व्हायचे त्यामुले विद्यार्थी व गरजू नागरिकांना त्रास व्हायचा आणि याचा गैरफायदा दलाल घ्यायचे मात्र आता सरकारमान्य इ सेवा केंद्रातून मूळ कागदपत्रे स्कॅन करून प्रस्ताव सादर केल्यास काही तासातच दाखले मिळणार आहेत दाखले घेण्यासाठी प्रांत कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत पहिल्या क्रमांकाचा प्रस्ताव उघडून पाहिल्यानंतर त्यावर शेरा मारल्याशिवाय दुसरा प्रस्ताव उघडणार नसल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम दाखला मिळणार आहे एक क्लिक वर एकाच वेळी अनेक दाखले निघतील मूळ कागदपत्रे स्कॅन होणार असल्याने बनावट दाखले निघणार नाहीत एखादा दाखळ्यात चुकी आढळल्यास त्या क्रमांकाचा दाखला रद्द करून लगेच नवीन दाखला मिळणार असल्याने एकाच नावाचे दोन दाखले घेऊन गैरफायदा घेता येणार नाही नायब तहसीलदार, तहसीलदार हे देखील ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करणार असल्याने स्वतः हातात प्रस्ताव घेऊन सह्या घेण्याचा त्रास वाचणार आहे.
यापूर्वीचे ऑफलाईन दाखले ग्राह्य धरले जाणार असून त्यांनी नवीन दाखले काढण्याची गरज नाही , नागरिकांनी शासनाने ठरवलेल्या फी व्यतिरिक्त कोणतीही जादाची फी देऊ नये, दलालां शी संपर्क करू नये , अधिकृत सेवा केंद्रातूनच दाखले काढावेत, मूळ कागदपत्रे स्कॅन करून परत ताब्यात घ्यावेत,आणि शक्यतो वर एकाच कुटुंबाचे दाखले एकाच वेळी काढून घ्यावेत असे आवा हन ही प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.