शिवाजी उद्यानात साजरा झाला सामूहिक दीपोत्सव..

शिवाजी गार्डन ग्रुप चा उपक्रम,५०० पणत्यांनी केला लखलखाट,बोहरी व मुस्लिम बांधवांच्या सहभागाने समाजिक एकात्मतेचेही दर्शन..अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील शिवाजी उद्यानात श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दिवाळी निमित्त सामूहिक दीपोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सामूहिकपणे सुमारे 500 दिवे संपूर्ण उद्यान परिसरात लावून लखलखाट करण्यात आला,विशेष म्हणजे या कार्यक्रमात ग्रुपचे क्रियाशील सदस्य असलेल्या बोहरी व मुस्लिम समाजाचे बांधव व महिला भगिनींनी अतिशय उत्साहात सहभाग घेऊन समाजीक एकात्मतेचा संदेश दिला.दिवाळी निमित्त नरक चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी हा उपक्रम राबविण्यात आला,सुरवातीला माजी आ.कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली यावेळी न प चे बांधकाम सभापती मनोज पाटील,पाणी पुरवठा सभापती राजेश पाटील,डॉ संजीव चव्हाण व या प्रभागाचे नगरसेवक निशांत अग्रवाल,जितेंद्र कटारि या,न प चे आरोग्य निरीक्षक वाय एस चव्हाण यांची प्रमुख उपस्थि ती होती,यावेळी उपस्थित मान्यवरांसह शिवाजी गार्डन ग्रुप च्या असंख्य महिला भगिनी व पुरुष बांधवांनी एकाच वेळी ५०० दिवे प्रज्वलित करून लखलखाट केला,या रोषणाई मुळे उद्यानाचे रूप खूपच खुलून दिसत होते,ग्रुप तर्फे महिला भगिणींने छत्रपती शिव राय स्मारक व परिसरात आकर्षक व सुंदर रांगोळ्या काढल्या असल्याने व ग्रुप सदस्य तथा धरणगाव पोलीस ठाण्यात नेमणुकी स असलेले पो. कॉ.सुनिल महाजन यांनी स्मारक परिसरात आक र्षक लाइटिंग लावून दिली असल्याने दीपोत्सवात त्याची भर पडून गार्डन चे रूप अधिकच खुलले.विशेष म्हणजे या दीपोत्सवात ग्रुप चे सदस्य मकसूद बोहरी,महेजान बोहरी,इम्रान खाटीक,जहुर शेख, मोमिन कंडक्टर,समीना बुऱ्हानी,सखींना बोहरी,आदी बोहरी व मुस्लिम बांधवांनी देखील उत्साहात सहभागी होत दिवे प्रज्वलित करून सामाजिक बांधिलकी दाखविली,यानंतर सर्वांनी एकत्रित पणे एकाच वेळी फुलझड्या पेटवून सामूहिक दिवाळी देखील साजरी केली. कृषिभूषण पाटील यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल   व केलेल्या सजावटी बद्दल ग्रुप चे खूपच कौतुक केले.उद्यानाचे विलक्षण रूप पाहून बाहेरील मंडळींनी देखील उद्यानात येऊन आनंद घेतला.
शिवाजी गार्डन ग्रुप ने गेल्याच महिन्यात सुमारे ५०० रोपांची लागवड उद्यान परिसरात करून प्रचंड मेहनतीने ती १०० टक्के जगविली एवढेच नव्हे तर ग्रुप सह सुप्रसिद्ध सुरेश एजन्सीचे सुरेश झाबक यांच्या सहयोगाने संपूर्ण रोपाना ठिबक सिचन् करून रोपे जगविण्यासह पाण्याची बचत देखील केली,या रोपाना आतापासूनच सुंदर फुले लागल्याचे कृषिभूषण पाटील यांनी पाहू न ग्रुपचा हा लोकसहभाग उत्तम असून लवकरच हे उद्यान नंदन वन ठरेल अशी भावना व्यक्त केली.न प चे प्रशासन अधिका री तथा ग्रुप सदस्य संजय चौधरी यांनी मनोगतातून काही समस्या मांडल्याने कृषिभूषण पाटील यांनी नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांच्याशी चर्चा करून उद्यानातील ट्रॅकवर रात्रीच्या वेळी देखील फिरता यावे यासाठी ठिकठिकाणी पथदिवे व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दर्शनी भागातील भिंत कमी करून त्यावर तारेचे कंपाऊंड करण्याचे आश्वासन दिले,व अजून काही मदत लागल्या स देण्याची तयारी दर्शवली.बांधकाम सभापती मनोज पाटील व ग्रुप सदस्य नरेंद्र दोढीवाला यांनी मनोगत व्यक्त केले व शेवटी आभार संजय चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ सौ अंजली चव्हाण,सौ उज्वला शिरोडे,सौ कल्पना शिरोडे,सौ कविता शिरोडे,सौ मीना आठवले,सौ संगीता आठवले, सौ अर्चना आठवले,सौ क्रिष्णा पटेल,नाणी अमृतकर,सौ राज कुमारी जैन,महेजान बोहरी,भाग्यश्री राजपूत,सौ रुपाली राजपूत, सौ दीपाली राजपुत,सौ स्नेहजाअहिरे,कु तनुश्री राजपूत,सौ सुनी ता  शर्मा,सौ स्वाती शर्मा,सौ तृप्ती शर्मा,समीना बुऱ्हानी,तसेच
नाना बडगुजर, भिकचंद जैन,पर्यंक पटेल,श्री महाजन,चेतन राजपुत,सोमचंद संदानशिव,पप्पू शर्मा,मनोहर बाविस्कर,प्रवीण संदानशिव,रविंद्र चौधरी,मोहन शिंपी,जयदीप राजपूत,रघुनाथ पाटील,इम्रान खाटीक,तेजेंद्र जांमखेडकर,जहुर शेख,मोमिन कंडक्टर,राजेंद्र चौधरी,भटेश्वर वाणी,योगेश वाणी,अमोल वाणी, नामदेव माळी,भालेराव यासह ग्रुप सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *