अमळनेर (प्रतिनिधी) समरसता साहित्य परिषदेच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
देवगिरी प्रांतात (मराठवाडा व खान्देश) पुढील तीन वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत असेल. परिषदेच्या एका विशेष बैठकीत समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे कार्यवाह डॅा. प्रसन्न पाटील यांनी या कार्यकारिणीच्या नियुक्तीसंबंधी घोषणा केली. निवड झालेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात येत आहे.समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, समरसता पुरस्काराने समरस साहित्यिकांना सन्मानित करणे , नवोदित साहित्यिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करणे इत्यादी कार्य समरसता साहित्य परिषद आयोजित करीत असते.
निवड करण्यात आलेली कार्यकारणी
अध्यक्ष : प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे (अंबाजोगाई ),उपाध्यक्ष : प्राचार्य डॉ.आनंद भंडारे (किनवट) , कार्यवाह : श्री नरेंद्र निकुंभ (अमळनेर ), कोषाध्यक्ष :श्री नवनाथ पवार( छत्रपती संभाजीनगर ), कार्यक्रम नियोजन आयाम प्रमुख : श्रीमती मृणालिनी देशपांडे (छत्रपती संभाजी नगर ), युवा आयाम प्रमुख : प्रा. डॉ. बाबुराव श्रीरामे (जालना) , महिला आयाम प्रमुख: प्रा.संगीता स्वामी( नांदेड), ग्रंथालय आयाम प्रमुख: प्रा. अलका सपकाळ (भूम) , प्रकाशन/ प्रकाशक आयाम प्रमुख: प्राचार्य डॉ. लता मोरे (खिरोदा जळगाव) , प्रसिद्धी आयाम प्रमुखः श्री सुरेश कुळकर्णी (जळगाव) सदस्य : श्री सतीश डिवरे (छत्रपती संभाजी नगर)