शासनाची फसवणूक करणाऱ्या ११० घरकुल लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करा…

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील घरकुलाचा पहिला हप्ता घेऊन काम सुरू न करणाऱ्या ११० लाभार्थी वर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पंचायत समिती च्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. राज्य शासनाच्या प्रधानमंत्री आवास, योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व पारधी आवास योजना या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजना असुन त्या योजने अंतर्गत ११० लाभार्थ्यांना  घरकुल बांधकाम साठी पहिला हप्त्याची रक्कम देवुनही सहा महिने पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरी पहिल्या हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग केली असून त्यांनी घरकुल सुरु करावे किंवा ती रक्कम शासनास परत करावी या अनुषंगाने वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे तरी देखील या लाभार्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही.
त्यामुळे शासनाची फसवणुक करणे, शासकीय निधीचा अपहार कर प्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येवुन त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी अशी विनंती करणारे निवेदन आज पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर याना गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी एल टी चिंचोरे, राणे, सचीन पाठक, बाळ विकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत , तालुका आरोग्य निरीक्षक डॉ दीपक पाटोडे आदी नी निवेदन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *