अमळनेर(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील अडावद येथील
हळदीच्या दिवशीच नवरदेवाचा खून केल्याप्रकरणी आरोपींना अमळनेर जिल्हा न्यायालयाने दोन महिलांसह एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालयाचे न्या.राजीव पी.पांडे यांनी बुधवारी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर घटना अशी कि २२ मे २०१६ रोजी मयत गणेश प्रल्हाद खंबायत याचे लग्न ठरले होते. त्यानिमित्त अडावद ता चोपडा येथील १९ मे रोजी हळद कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात नाच गाणे साडे आठ ते ११.३० पर्यंत सुरु होते. यावेळी शेजारी राहणारे चुलत भाऊ तुकाराम काशिनाथ खंबायत, पत्नी रेखाबाई तुकाराम खंबायत, यांच्यात वाद सुरु होता. यावेळी मयत गणेशचा मामेभाऊ किशोर सूर्यवंशी भांडण सोडवत असताना किशोर याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर धारदार चाकूने आरोपी तुकाराम याने वार केला किशोरने स्वतःचा बचाव केल्यानंतर नवरदेव गणेश देखील भांडण सोडविण्यास गेला असता रेखाबाई तिची आई सुशीलाबाई यांनी गणेश हात पकडून दोघांनी घरात ओढले व दरवाजा बंद केला त्यावेळी किशोरने गणेशचा भाऊ हिरालाल यास आरोळी मारली यावेळी बंद घरात हिरालालने लाथ मारून दरवाजा उघडला त्यावेळी रेखाबाई व सुशीलाबाई या दोघांनी गणेशचे हात घट्ट पकडून ठेवले होते. तुकाराम याने धारदार चाकूने गळ्यावर गणेशवर वार करीत चाकू आरपार घातला. त्यात गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाला उचलून अडावद येथील दवाखान्यात दाखल केले असता तो मृत झालेला होता. सदरची घटना रेखाबाई हिचे गावातील देवानंद बलदेव कोळी याच्यासोबत अनैतिक संबंध होते. हि माहिती नवरदेव गणेश यास माहिती होती. आरोपी गणेश हा बदनामी करेल या धाकाने तुकाराम व रेखाबाईची आई सुशीलाबाई अरुण बरडे रा.साकेगाव ता.भुसावळ यांनी भांडणाचे नाटक करून गणेश यास घरात बोलावून त्याला जिवंत मारले. यात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागुल मंगरुळकर यांनी युक्तिवाद केला. त्यात महत्वाचे साक्षीदार म्हणून प्रत्यक्षदर्शी पाहणारे साक्षीदार हिरालाल, किशोर सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी, तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, चाकू काढून देणारे पंच व इतर लोकांची साक्ष महत्वाची ठरली. यात घटनेत आरोपी तुकाराम, रेखाबाई तुकाराम खंबायत व सुशीला बरडे यांना कलम ३०२ मध्ये जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व कलम ३२४ मध्ये १ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा अशी शिक्षा जिल्हा न्या राजीव पी पांडे यांनी ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून अशोक साळुंखे यांनी काम पाहिले घटनेपासून आरोपी कारागृहात होते शिक्षा झाल्यानंतर त्यांना जिल्हा कारागृहात नेण्यात आले.