निम येथे ग्रा.प कार्यालय व जिल्हा परीषद वर्ग खोलीचे थाटात भूमीपूजन..कपिलेश्वर देवस्थानाचा कायापालट करण्याचे संकेत
अमळनेर -(प्रतिनिधी)माझ्या मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून त्यातही ग्रामविकासाला अधिक प्राधान्य देत आहे.अनेक गावातील ग्रामपंचायत इमारती जिर्ण व पडक्या झाल्या असताना बहुतांश गावात अत्याधुनिक व सर्वसुविधायुक्त ग्रा. प. इमारती निर्माण करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे,यापुढेही ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असून.गाव तेथे नविन ग्रामपंचायत हे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करणार आणि कपिलेश्वर देवस्थानचा टप्प्याटप्प्याने कायापालट करणार असा निर्धार आ.शिरीष चौधरी यांनी निम येथे व्यक्त केला.
निम येथे ग्रामपंचायत ग्रा प कार्यालय व जिल्हा परीषद वर्ग खोलीचे भूमीपूजन आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.सुरवातीला ग्रामस्थानी आंमदारांचे जल्लोषात स्वागत केले.भूमीपूजनानंतर आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना आ.चौधरीं म्हणाले की ज्या गावांत अत्याधुनिक ग्रा प इमारती निर्माण झाल्या तेथील कारभार अत्याधुनिक झाला असून यामुळे ग्रा प सरपंच व पदाधिकारी आपला जास्तीत जास्त वेळ ग्राम पंचयातीस देत आहेत,परिणामी ग्रामस्थांची,व नागरी सुविधेची कामे मार्गी लागून विकासाची वाटचाल देखील वेगाने होत आहे, निम येथेही अत्याधुनिक नवीन ग्रामपंचायत निर्माण झाल्यानंतर असेच चित्र निर्माण झालेले दिसेल.तसेच या गावातील युवकांना शारीरिक दृष्ट्या सशक्त व निरोगी बनविण्यासाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधण्याचे संकेत आमदारांनी दिले. तिर्थक्षेत्र योजने अंतर्गत कपिलेश्वर मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने लवकरच संर क्षकभिंत होणार असून टप्प्या टप्याने विविध विकास कामांच्या माध्यमातून कायापालट करण्याचे व गावाप्रती कायमस्वरूपी बांधिलकी ठेवण्याचे अभिवचन आमदारांनी ग्रामस्थांना दिले.
आ.चौधरींच्याच प्रयत्नाने निम गाव प्रवेशापासून गाव संपेपर्यंत मुख्य रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण करण्यात आल्याने तसेच जलयुक्त शिवार योजनेमध्ये निम गावाचा समावेश झालेला असल्याने निमचे विद्यमान सरपंच भास्कर चौधरी यांनी आ. शिरीष चौधरी यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी तांदळी सरपंच प्रमोद पाटील, माजी सरपंच मधुकर चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, रमेश पाटील, योगेंद्रसिंग राजपूत, राजेंद्र चौधरी, विजय रतन पाटील, मगन पाटील, गुलाब आगळे, रोहि दास पाटील, ग्रामसेवक आर एल पाटील, गोपाल पाटील, केसर सिंग पाटील, चंपालाल पाटील, दत्तात्रय पाटील, हिलाल कोळी, चंपालाल पाटील, छोटू चौधरी, डॉ एल डी चौधरी, पोलीस पाटील मंगल पाटील, विनोद क्षीरसागर, सुधीर चौधरी, मधुकर चौधरी, रवींद्र पाटील, कैलास पाटील, नारायण कोळी, अविनाश पाटील, दत्तू आगळे, दिनेश करनकाळ, हेमंत चौधरी, जयेश चौधरी, सचिन परदेशी, राजेश महाजन, व ग्रामस्थ उपस्थित होते.