जळगाव ता.अमळनेर जैतपीर येथे योग प्राणायाम शिबीरात पतंजली योगपीठ हरिद्वार (उत्तराखंड) येथील स्वामी आनंददेव जी महाराज यांच्या सानिध्यात योगा करण्यात आला. योग-आयुर्वेद विषयी माहिती देण्यात आली.
शिबीरात विधानसभा सदस्य,अमळनेर आमदार ताई सौ.स्मिता ताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप पाटील सर तथा पतंजली जळगाव जिल्हा योग-प्रचारक कमलेश आर्य (कुलकर्णी) तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
स्वामी आनंददेवजी महाराजांनी योग आयुर्वेदीय माहिती तसेच स्वदेशी विषयी माहिती दिली.रोज योगा करण्याचे फायदे सांगितले ,सर्व नागरिकांनी योग शिबीरात सहभाग घेतला.