लोक अदालतीत पाच खटले काढले निकाली,सबगव्हान येथे आज लोक अदालत..
अमळनेर-येथील न्यायालयात आयोजित केलेल्या लोक अदालती निमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई येथील फिरती विधी सेवा मोबाईल व्हॅन काल दाखल झाली होती यावेळी झालेल्या सुनावणीत सुमारे चार ते पाच खटले निकाली काढण्यात आले.आजही हि व्हॅन अमळनेर तालुक्यात असून आज सब गव्हान येथे लोक अदालातीचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर येथे झालेल्या लोक अदालतीत अनेक खटले ठेवण्यात आले होते,त्यापैकी ४ ते ५ खटले निकाली काढण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश आर पी पांडे ,व्ही पी आव्हाळ, दिवाणी न्यायाधीश वाणी तसेच दिवाणी न्यायाधीश क स्थर चौखडे ,कुलकर्णी वळवी तसेच सरकारी वकील किशोर आर बागुल ,शशिकांत पाटील ,आर बी चौधरी तसेच तिलोत्तमा पाटील,रियाज काझी, नंदूकुमार सूर्यवंशी, डी एस पाटील,नरेंद्र बाळू पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार हजर होते.