बोगस फायनान्स कंपनीचा पर्दाफाश; कर्जाचे आमिष दाखवून भोळ्या-भाबळ्या महिलांची फसवणूक…

फायनान्स कंपनीत लाखोंचा अपहार…अमळनेर– आशापुरी फायनान्स बिझनेस सोल्युशन प्रा.ली. कंपनी च्या नावाने कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांकडून साडेबारा लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
आशाबाई भगवान पाटील यांनी फिर्याद दिली की ४ जुलै २०१८ रोजी कैलास हिम्मतराव पाटील रा गोवर्धन व छगन वसंत जाधव व्यवस्थापक हे घरी आले व त्यांनी सांगितले की आशापुरी फाय नान्स बिझनेस सोल्युशन प्रा. ली.या कंपनीचे मुख्य कार्यालय शेंदूरणी ता जामनेर येथे असून अमळनेर येथे शाखा सुरू कराय ची आहे कंपनी कडून तुम्हाला २० हजार ५०० रु दरमहा पगार मिळेल व या कंपनी कडून शेतकऱ्याना ५ टक्के दराने कर्ज देणार असून शेतकऱ्यांकडून १८८७ रु फी घेऊन त्यांचाकडून कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव घ्या त्यानंतर यांनी मला व इतरांना शेतकरींचा सेमिनार घेऊन मार्गदर्शन केले नंतर शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेऊन त्यांचे फाईल व प्रोसेसिंग फी घेऊन ती रक्कम अमलनेरच्या मीना पाटील यांच्यामार्फत कैलास पाटील, छगन जाधव यांना अमळनेर कार्यालयात जाऊन जमा करत गेली परंतु एकाही शेतकऱ्यांचे कर्ज मंजुर झाले नाही म्हणून माझी व ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने मी पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला त्यावेळी कैलास पाटील व छगन जाधव यांनी सांगितले की यापुढे आशापुरी फायनान्स नव्हे तर इंद्रा फायनॅन्सीयल ही कंपनी कर्ज मंजूर करणार असून त्याचे कार्यालय पूजा मार्केट बिल्डिंग,व्ही एस कॉलेज मेरठ (दिल्ली) येथे असून त्याचे प्रभारी नदीम मोहम्मद शेख असून ते कर्ज मंजूर करतील असें सांगून माझ्याकडून ४१ प्रकरणाचे एक लाख ३८ हजार रुपये , मीना रवींद्र पाटील यांच्याकडून ३ लाख रुपये , प्रीती संजय बारी यांच्या कडून एक लाख रुपये , जयश्री मुकेश चौधरी यांच्याकडून ४८ हजार रूपये आनंद बैसाणे यांच्याकडून ६४ हजर रु,आशीर्वाद धिवरे यांच्याकडून ४ लाख रुपये,आशा नामदेव पाटील यांच्या कडून २ लाख रुपये असे एकूण साडे बारा लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन रकमेचा अपहार केला व फसवणूक केली म्हणून कैलास पाटील गोवर्धन(अमळनेर),छगन वसंत जाधव रा. विषव गड ता. भिवंडी जि.ठाणे नदीम मोहम्मद शेख रा. मेरठ यांच्या विरुद्ध भादवी ४२०,४०६ ,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावेळी पो.नि.यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बागडे,रवि पाटील, किशोर पाटील, विजय साळुंखे, योगेश पाटील, योगेश महाजन, संतोष पाटील,या डी.बी. पथकाने कामगिरी बजावली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *