अमळनेर(प्रतिनिधी) परवा माझ्या विरुद्ध प्रसिद्धीस पत्रक देणारा भा.ज.पा.चा शहर अध्यक्ष “तोतया” असुन कार्यकर्त्यांमधून निवडून आलेल्या अध्यक्षाला बाजुला सारून याला वरून ठेवलेला आहे.जे दि.२२/१०च्या बैठकीस हजर नव्हते ,आणि ११/१०च्या बैठकीत ज्यांच्या सह्या आहेत अश्यांच्याही डुप्लिकेट सह्या ह्या निवेदनावर घुसडल्या आहेत.आम्ही सह्या केल्या नाहीत अशा अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत.तोतया अशी बनवा-बनवी करू शकतो ह्यात शंका नाही.
श्री.लालचंद सैनानीच्या सत्कार समारंभात मी पाडळसरे धरणाबाबत जी वस्तुस्थिती मांडली त्यात कुण्याही पक्ष नेत्याचा नामोल्लेख केला नाही ,मी जे सत्यकथन केले त्याचे चटके ह्यांना का लागले?तांत्रिक मंजुरी मिळाली म्हणुन जणु आता धरणाचे काम झाले अश्या थाटात गावभर स्वतःचे पाठ थोपटणारे फलक लावुन लोकांच्या हास्याचा विषय कोण ठरले?जनतेची दिशाभुल कोण करतंय?त्यात माझा वैयक्तिक स्वार्थ कोणता?आणि माझ्या वक्तव्या मुळे पक्ष पराभवाची ह्यांना भीती वाटत असेल तर त्यावर विचारमंथन का होत नाही.
सत्य कटु वाटले म्हणुन मला पक्षातुन काढण्याची भाषा करणाऱ्यांची राजकीय आणि सामाजिक लायकी काय?माझ्या वक्तव्या मुळे यांना पक्ष प्रेमाचा उमाळा आला,आणि ज्या माजी आमदाराने देशाच्या पंतप्रधानांना फोनवरून आई बहिनीवरून शिव्या घातल्या त्यावेळी ह्यांचा उमाळा का आटला होता?पक्षाच्या आमदाराला बाहेरचा रस्ता दाखवायचा आणि उपऱ्याना स्टेज वर बसवायचे ही कोणती क्षुद्र संस्कृती आहे!
स्वतः च्या पोटापाण्यासाठी आणि पदांच्या लालसेपोटी राजकीय गुंडाभोवती पिंगा घालणाऱ्या भिंगोट्यांनी माझ्या ह्या वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत,ही विनंती.