तहसीलदारांना निवेदन,पत्रकार हक्क संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची केली मागणी.अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एका वृत्तपत्राच्या वार्ताहरावर चुकीची बातमी छापल्याचा आरोप करून सहा जणांनी भ्याड हल्ला केल्याने अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत संबधित आरोपींवर पत्रकार हक्क संरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी या मागणीचे निवेदन अमळनेर तहसीलदार प्रदीप पाटील यांना दिले.
सदर निवेदनात म्हटले आहे की जामनेर येथे चुकीची बातमी छापल्याचा आरोप करीत एका नगरसेवकाच्या पुत्रासह सहा जणांनी एका नामांकित वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी लियाकत संय्यद यांच्यावर भ्याड हल्ला करून अमानुष मारहाण केली, सदर प्रकरणी आरोपींवर जामनेर पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारावर अश्या पद्धतीने हल्ला होणे योग्य नसून झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्व पत्रकार बांधव निषेध करतो,तरी हल्ला कारणाऱ्यांवर पत्रकार हक्क संरक्षण कायद्यानुसार त्वरित कारवाई करावी व भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.
निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,सचिव चंद्रकांत पाटील, माजी संस्थापक अध्यक्ष किरण पाटील, सल्लागार संजय पाटील,पंडित चौधरी,पांडुरंग पाटील,राजेंद्र पोतदार,चंद्रकांत काटे,तसेच सदस्य महेंद्र रामोशे,उमेश काटे, जितेंद्र ठाकूर,भटेश्वर वाणी,जितेंद्र पाटील,अमोल पाटील,ईश्वर महाजन,सदानंद पाटील,मुन्ना शेख,आबीद शेख,युवराज पाटील,महेंद्र पाटील,कुंदन खैरनार,गुरूनामल बठेजा,वसंतराव पाटील,सत्तर खान,आदी सदस्य उपस्थित होते.