अमळनेर– प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य म्हणून मानली जाणारी जळगांव जिल्ह्यातील सहकारी नोकरांची ग.स.सोसा-यटीत तज्ञ संचालकपदी जि.प.प्राथमिक शाळा- दहीवद खु.ता.अमळनेर येथील कार्यरत शिक्षिका छाया शिवाजीराव सोनवणे यांची कार्यकारी मंडळाने सर्वानुमते निवड केली.
छाया सोनवणे ह्या जि.प.प्राथमिक शाळा दहीवद खु.ता.अमळनेर येथे कार्यरत असून त्यांना शासनाने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविले आहे.त्या समाज कार्यात सदैव अग्रेसर असतात.त्यांना माहेरच्या व सासरच्या मंडळी कडून समाज सेवेचा वसा लाभला आहे त्यांचा त्यानिमित्ताने सत्कार करतांना सहकार गटाचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा आबासाहेब बी.बी.पाटील. गटाचे श्रेष्ठी झांबर राजाराम पाटील. एस.एस.पाटील,व्ही.झेड. पाटील, संचालक श्यामकांत भदाणे .डी.सी.पाटील,गटनेते उदय पाटील, विद्यमान अध्यक्ष विलास नेरकर,उपाध्यक्ष के.पी.चव्हाण सर,कर्मचारी नियंत्रण समिती अध्यक्ष अनिल गायकवाड-पाटील , ग.स.प्रबोधिनीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले,आदि सन्माननिय सर्व संचालक जिल्हाभरातील सहकार गटाचे कार्यकर्ते यावेळी उप-स्थित होते.