अमळनेर येथे गुजरात राज्याने बहुजन क्रान्ति मोर्च्याच्या समारोपीय कार्यक्रमाला परवानगी नाकारून संविधानाची पायमल्ली केल्याचा निषेधार्थ निवेदन देऊन जेल भरो आंदोलन करण्यात आले.अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथे बहुजन क्रान्ति मोर्चा च्या वतीने गुजरात सरकार व पोलीस प्रशासनाने अहमदाबाद येथे दि २२ ऑक्टोबरं रोजी बहुजन क्रान्ति मोर्च्या च्या समारोपीय कायर्क्रमाला ऐनवेळेला परवानगी नाकारून संविधानाच्या अनुच्छेद -१९ चे उल्लंघन केल्याचा निषेधार्थ देशव्यापी जेल भरो आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर बहुजन क्रान्ति मोर्च्या च्या कार्यकर्त्यानी ठीक ठिकाणी निवेदन देऊन जेलभरो आंदोलन केले , त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर येथील कार्यकर्त्यानी अमळनेर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरील घटनेचा निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी बहुजन क्रान्ति मोर्चा चे संयोजक संदीप सैदाने, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश बोरसे, संजय मरसाळे, सुरेश कांबळे, आदिवासी एकता संघर्ष समिती चे प्रदेश अध्यक्षा प्रा जयश्री साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते दाजीबा गव्हाणे, किरण लोखंडे,हरिश्चंद्र कढरे ,भारतीय विध्यार्थी मोर्च्याचे प्रवीण बैसाने, बेरोजगार मोर्च्याचे कृष्णकांत शिरसाट, बाळासाहेब सोन- वणे, रमेश घोलप, अर्जुन संदांनशीव, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुनील करंदीकर,जयवंत वानखेडे,राहुल सरदार,मनोज महाजन इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते