कुऱ्हाड बंदीचा नारा लावणाऱ्यांनी छोटू जैन वर गुन्हा दाखल करावा-पर्यावरण प्रेमींची मागणी.अमळनेर येथे काल २१ रोजी सलीम टोपी च्या नारळ विकण्याच्या दुकाना जवळ दोन भली मोठी डेरेदार झाडे होती एक महावृक्ष वारूळ अन दुसरे कडू निंब अतिशय हिरवेगार वृक्ष होते.बाजूला होणाऱ्या शॉपिंग ला नडत असल्याने त्या वृक्षांची कत्तल झालीय बाजूलाच असलेल्या नगरपरिषदेच्या छाताड्यावर नाचत गाजत झाडे कापली गेलीत, झाडे जिवंत होती पाखरांची घरटीही होती.तर वृक्षतोडीची परवानगी का दिली गेली कुणी दिली काही चिरीमिरी झाली का..? त्यांचे बद्दलही वरिष्ठांकडे तक्रार होणार आहे.काल रविवार असल्याने कुऱ्हाड आराम करत झोपली होती आज जागे झाली असेल त्या कुऱ्हाड ने असल्या माजलेल्या लोकांना वेळीच धडे शिकवायला हवेत नगरपालिका, वन विभाग, तहसीलदार साहेबांनी यांची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा ही वृक्षप्रेमींची मागणी आहे.