राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड.अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील प्रताप कनिष्ठ महाविद्या लयातील इयत्ता ११ वी कला शाखेचा शिक्षण घेणारा गणेश राम दास व्हलर या विद्यार्थ्यांने गरिबीच्या परिस्थितीवर मात करीत नुकतेच राज्यस्तरीय अँथेलेटिक्स स्पर्धेत त्याने बांबू उडीत सतरा वर्षाआतील गटात सुवर्णपदक मिळवून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड करण्यात आलेली आहे, गणेश व्हलर याने मिळवलेल्या यशा बद्दल त्याचा सत्कार आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी न.पा.गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक नरेंद्र चौधरी, माजी सरपंच राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, प्रताप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा अमृत अग्रवाल,तालुका क्रीडा समनव्यक एस.पी.वाघ, क्रीडा शिक्षक डी.डी.राजपूत,सुरेंद्र पाटील,एम.पी.माळी,एन.आर.रामदास,निलेश विसपुते,दिपक मद्रासी,भूषण पाटील,अरबाज टकारी,मयूर चौधरी,जयेश चौधरी, नंदु पाटील,राजेश महाजन,रमाकांत चौधरी,ललित चौधरी,राजेश चौधरी,प्रथमेश चौधरी यावेळी उपस्थित होते