अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील धुळे रस्त्यावरील अशोक भालेराव नगर भागात असलेल्या तिलोत्तमाताई रविंद्र पाटील यांच्या मालकीचं वेदप्रिय अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संगीता कृष्णकांत आठवले या ४५ वय असलेल्या महिला दुपारी घरीच असतात गेल्या तीन-चार दिवसांपासून या अपार्टमेंटमध्ये अनोळखी तीन चार मुले चकरा मारीत होते शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक सुटाबुटातला अनोळखी व्यक्ती या अपार्टमेंट मध्ये शिरला व पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संगीता कृष्णकांत आठवले यांच्याकडे त्याने पिण्यासाठी पाण्याची मागणी केली.
यावेळी संगीता आठवले या घरात पाणी घेण्यास गेले असता पाणी घेऊन परतलेल्या संगीता आठवले यांच्या हातातून ग्लास घेतल्यानंतर त्याने एक हात पकडून तोंडाला मिरची पावडर लावली व बरे वाईट करण्याचा अथवा घरातील वस्तू लांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी संगीता आठवले यांनी त्या अनोळखी व्यक्तीला धाडसपणे जोरदार प्रतिकार केल्याने झटापट करत त्यात संगीता आठवले यांचा गळा देखील दाबण्याचा प्रयत्न केला यावेळी संगीता यांनी जोरदार प्रतिकार केल्यामुळे व आरोळ्या मारल्याने शेजारी जमा होईपर्यंत ती व्यक्ती वरून उडी मारून अपार्टमेंटच्या मागच्या बाजूने पसार झाला या फ्लॅटमध्ये संगीता आठवले त्यांचे पती कमल टी हॉटेल चे संचालक आहेत मुलगा आणि पती दुकानावर गेल्याने फ्लॅटमध्ये संगीता आठवले या एकट्याच घटनेच्या वेळी होत्या. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अनोळखी व्यक्ती पासून सावधान-
पो.नि.अनिल बडगुजर
यंदा दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये यासह अनोळखी व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारच्या वस्तू विकत घेऊ नये अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला प्रवेश देऊ नये अपार्टमेंटमधील भागात राहणाऱ्या नागरिकांनी याची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा एखादी अप्रिय घटना घडू शकते तेव्हा नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी केले आहे.