प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर होणार प्रतिष्ठापना,
सोमवारी भव्य शोभायात्रा..खा.शि.मंडळाच्या विद्यमान संचालक मंडळाचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम..
अमळनेर– अमळनेर कर्मभूमीसाठी न भूतो न भविष्यती असे विशेष योगदान देणाऱ्या श्रीमंत प्रताप शेठजींचा पुतळा आजच्या पिढीसह विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावा यासाठी शेठजींसह त्यांच्या धर्मपत्नी माता भागीरथीदेवी यांच्या पुतळ्याचे प्रताप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थानांतर होत असून हा स्थानांतर सोहळा सोमवार दि २२ रोजी थाटात पार पडणार आहे,प्रतिष्ठापनेपूर्वी दोन्ही पुतळ्याची शहारात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल,यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविला जात असून यास कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन सह विद्यमान संपूर्ण संचालक मंडळाचे प्रोत्साहन व सहकार्य मिळाले आहे.यानिमित्ताने प्रताप शेठजींच्या महान कार्याला व आठवणींना उजाळा मिळणार आहे,दि २२ रोजी सकाळी ८ वा बन्सीलाल पॅलेस,प्रताप मिल कंपाऊंड येथून शोभयात्रेस प्रारंभ होणार असून ही शोभायात्रा स्टेशन रोड राणी लक्ष्मीबाई चौक,दगडी दरवाजा,सराफ बाजार,वाडी चौक,माळी वाडा,कुंटे रोड,धुळे रोड,मार्गे ग स हायस्कुल येथे समारोप होणार आहे.तरी शोभयात्रेच्या मार्गावर अमळनेर कारांनी रांगोळ्या काढून शोभयात्रेचे स्वागत करावे असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
विविध ज्ञान संस्थांची उभारणी करणारे शेठजी..
श्रीमंत प्रताप शेठजींनी अमळनेर नगरीत 1906 मध्ये स्वदेशीच्या प्रचारासाठी उदयोग पर्वाला सुरवात करून 1914 मध्ये खान्देश शिक्षण मंडळाची स्थापना केली,तसेच अमळनेर व धुळे येथे दोन कापड गिरण्यांची उभारणी करून हाताला काम आणि भागधारकांना दांम व त्यातून मिळणाऱ्या मोबादल्यातून शहराचा कायापालट करून विविध ज्ञानसंस्थांसह इतर संस्थांची उभारणी केली,प्रताप हायस्कुल,प्रताप महाविद्यालय,प्रताप तत्वज्ञान केंद्र,प्रताप चेरीटेबसल हॉस्पिटल,श्रीराम मंदिर,आदी अमळनेर येथे उभारले तर प्रताप विद्या मंदिर चोपडा,कालडेरा राजस्थान येथील श्री सहारिया हायस्कुल,नाशिक येथील भोसला मिल्ट्री स्कुल(डॉ मुंजे यांच्या सहकार्याने) या संस्थांची उभारणी केली.याचप्रमाणे ज्ञान,कर्म,भक्ती आरोग्य तत्वज्ञान,लष्करी शिक्षणाची गंगोत्री तयार करून सर्वसामान्य जनतेपर्यंत हे कार्य पोहोचवून संधी प्राप्त करून दिली,येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी देश विदेशामध्ये प्रतापिय म्हणून आजही ज्ञानोत्तर वैभव संपन्न जीवन जगत असून राष्ट्राची व विश्वाची सेवा करीत आहेत,तसेच श्रीमंत प्रताप शेठजींनी देशभरातील सर्वच तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरभरून देणगीही दिली आहे,अश्या महान विभूतींच्या पुतळ्याचे प्रताप हॉस्पिटल परींसरातून स्थानांतर होऊन प्रताप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रतिष्ठापना होत असल्याने या निर्णयाबद्दल खा शि मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तरी या प्रेरणादायी सोहळा व शोभयात्रेस तमाम अमळनेरकर व शेठजी प्रेमींनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन खा शि मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम,उपाध्यक्ष सौ माधुरी पाटील,कमल कोचर,विश्वस्थ सौ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल,कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन,संचालक प्रदीप अग्रवाल,योगेश मुंदडे,हरी भिका वाणी,कल्याण पाटील,डॉ बी एस पाटील,डॉ संदेश गुजराथी,चिटणीस प्रा ए बी जैन,प्राचार्य डॉ जे एस राणे,मुख्याध्यापक प्रतिनिधी सौ जे के सोनवणे,महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा डॉ.ए.बी.पाटील,शिक्षक प्रतिनिधी डी व्ही महाले आदींनी केले आहे.