सडावण शेतातील मक्याला आग जळून खाक…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सडावण येथे शेतातील १२० क्विंटल मका जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे सुमारे दोन अडीच लाखाचे नुकसान झाल्याची घटना १९ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.
सडावण येथील अशोक पितांबर पाटील यांच्या ५ एकर शेतात मका लावला होता नुकताच मका खुडून शेतात ठेवण्यात आला होता १९ रोजी त्यांचा मुलगा निलेश दुसऱ्या शेतात हरभऱ्याला पाणी देण्यासाठी गेला असता त्याला मका जळलेला आढळून आला घटनेचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी धाव घेतली मका बुद्धिपुरस्कर संशयिताने जाळल्याचा आरोप अशोक पाटील यांनी केला आहे अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे पोलीस पाटील नितीन जाधव,तलाठी जितेंद्र जोगी,कृषी अधिकारी एल.व्ही.पाटील यांनी पंचनामा केला आधीच दुष्काळी असलेल्या तालुक्यात लागोपाठ मका जळाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *