अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील इंदिरानगर भागातील दशरथ भिका पाटील वय ४५ यांनी १९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्याघरी पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगल ला सर्व्हिस वायर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा जितेंद्र घरी आल्यानंतर त्याला वडील मृतावस्थेत आढळले पोलीस पाटील भागवत पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दशरथ पाटील यांनी गंभीर आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन करीत आहेत.