अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहरातील हरिओम नगरमधील राजेश दिनेश्चंद्र पांडे हे तारापूर जि.ठाणे येथे नोकरीला गेलेले असताना अज्ञात चोरट्याने १७ ते १८ दरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंड व कुलूप तोडून घरातील ५ हजार रुपये किमतीचे २ ग्राम सोन्याचे नाणे व १० हजार रुपये रोख चोरून नेले पांडे नोकरीवरून अमळनेर परतल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.