२५ पैसे (चाराणे) देखील अद्याप बंद झालेले नाहीत, त्या मुळे असे भारतीय चलन कुणीही नाकारत असेल तर तो राष्ट्रद्रोहचा गंभीर गुन्हा आहे.
नागरिक पंचवीस पैसे पन्नास पैसे वा रुपया दोन रुपया पाच रुपयांची नोट देतात पण कुणीही लहान मोठा व्यापारी,विक्रेते वा बँक हे भारतीय चलन नाकारत असेल तर त्या विरुद्ध अमळनेर पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा.
अगदीच शक्य नसेल तर प्रांत,तहसीलदार यांचे कडे तक्रार द्यावी व भारतीय चलन जो व्यापारी नाकारेल त्यांना धडा शिकवावा असे आवाहन खाजगी कोचिंग क्लासेस चे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.१० चा डॉलर देखील घेतांना वाकडा तीकडा डोळा केला जातो. अशा लहान मोठे व्यापारी,विक्रेत्यांना प्रशासनाने धडा शिकवावा अशी मागणी देखील सामान्य नागरीकांनी केली आहे.
जे चलन व्यापारी, बस वाहक, रेल्वे शासन वा अन्य कुणीही स्वीकारत नाही त्यांचे विरुद्ध तक्रार द्या अथवा सामूहिक उपोषण, आंदोलन वा तत्सम न्याय मार्गे दाद मागा असा आग्रह देखील संजय क्लासेस चे संचालक संजय पाटील यांनी धरला आहे.
नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याकडे जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.