अमळनेर (प्रतिनिधी) आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी ०२/०१/२०१९ या अहर्ता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र व्यक्ती यांना नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०१८
दि.१ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान घोषित केलेला आहे त्यामध्ये मतदार म्हणून आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आपल्या गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.एल.ओ. यांचेकडे नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर ६ तात्काळ भरून द्यावा व लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा.आता केवळ १४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे तरी सर्व युवा / नवमतदार यांना पुन्हा एकदा नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे.
प्रदीप पाटील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अमळनेर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.