अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुक्यात शिवजन्मोत्सवाची तयारी सुरु केली आहे. शिवजयंती उत्सव समितीचा वतीने पारंपरिक पध्दतीने शिवजयंती साजरी होणार आहे.
नाट्यमंदीर परिसर भगवमय करण्यात आले आहे. मुख्य आकर्षण बोहरा स्कुलचे पथनाट्य , नारीशक्ती इव्हेंट गृपचा सजीव शिवजन्मोत्सव , मंगळ ग्रह मंदीर देखावा, एस पी गृप टाकरखेडा लाठ्या काठ्यांच कर्तब , सरस्वती शाळेचे लेझीम पथक , राजमुद्रा गृपचे ढोल पथक, राणाजी बँड , सजीव घोडेस्वार मावळे , द्रोण (राधे पवार ) फोटो ग्राफी (राज व चेतन ) , अमळनेर युवा मित्र परिवार व नगरपरिषद अमळनेर यांच्या अनमोल सहकार्याने पाचपावली देवी मंदीरापासुन सकाळी १०-०० वा. पवन चौक , तिरंगा चौक , बस स्टँड , महाराणा प्रताप चौक व समारोप नाट्यमंदीर येथे होणार आहे. यावेळी प्रतीक्षा पाटील यांचे व्याख्यान झाल्यावर प्रशासनाचा वतीने महाआरती करण्यात येईल मिरवणूकीत तुषार सोनार यांच्या वतीने दरवर्षी प्रमणे पिण्याच पाणी वाटप करण्यात येईल , नाट्यमंदीर येथे रणजीत शिंदे सर यांच्या कडून अल्पोहार वाटप करण्यात येणार आहे , पाचपावली देवी मंदीर येथे अल्पोहार विपूल गारमेंट्स कडून देण्यत येणार आहे , भैय्या महाजन व राज लाड हे थंड पेय वाटप करणार आहेत , निलेश फार्मा व हाॕटेल संजय यांच्या कडून लस्सी वाटप , खाँदेश रक्षक गृप कडून मिरवणूकीत शरबत वाटप करण्यात येणार आहे मोठ्या संख्येने थाटा माटात हजारोंचा सख्येने समील व्हावे व पारंपरिक पध्दतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन समितीचा वतीने करण्यात आले असुन सगळे मतभेद विसरुन ऐतिहासिक मिरवणूकीचे साक्षीदार व्हावे , पाचपावली देवी ते नाट्यमंदीर शिवजयंती मिरवणूकीत रिल्स, फोटो व व्हिडिओ व्हाट्स अप , इंन्स्टा , फेसबुक शेअर करा व मिळवा आकर्षक बक्षिसे हि स्पर्धा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजीत करण्यत आलेली आहे.