अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची युवक काँग्रेस ची मागणी…!

अमळनेर-विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात बाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामधे अमळनेर तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा खुपच कमी झालेले असुन जिराईत व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. रब्बी हंगाम घेता येणे शेतकर्यांना शक्य नाही. आजच शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्या हतबल झालेले आहेत. शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेले असुन शासन स्तरावरुन कोणतीही भरीव मदत शेतकर्यांना मिळालेली नसल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच हेक्टरी ५०००० रुपये तात्काळ मदत द्यावी अशी मागणी निवेदणाद्वारे करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेस चे मा.जिल्हाध्यक्ष पराग पाटील,अमळनेर विधानसभा अध्यक्ष अमोल माळी,सरचिटणीस सय्यद कदीर, मनोज बोरसे,नरेंद्र पाटील,विजय धोत्रे,भुषण पाटील,शरीफ शेख,योगेश जाधव,कुणाल पाटील आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *