अमळनेर (प्रतिनिधी) शासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
शासकीय एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षा जी. एस. हायस्कूल अमळनेर येथे पार पडली. शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांपैकी देसले जयश दिपक (१०वी), पवार यशराज प्रवीण (९वी), कोठावदे पार्थ नितीन (८वी), नेरकर सुमित किशोर (९वी), साळुंखे अनिकेत रोहिदास (९वी), कोठावदे अथर्व जितेंद्र (८वी) वाघ चिराग शैलेश पाटील (९वी), दर्शन अधिकार पाटील (९वी), पाटील कल्याणी दिनेश (७वी) या सर्वांना यश प्राप्त झाले. यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य विकास चौधरी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन कलाशिक्षक गणेश सातपुते यांनी केले.