मालमत्ता कर थकबाकीपोटी अमळनेर शहरातील पतपेढ्यांना ठोकले सील

अमळनेर (प्रतिनिधी) पतपेढ्यांकडे सुमारे 22 लाख 50 हजाराची थकबाकी असल्यामुळे थेट पालिकेच्या पथकाने या पतपेढ्यांना सील ठोकल्याने खळबळ उडाली.
शहरातील थकबाकी असलेल्या श्रीराज पतपेढी आशापुरी पतपेढी पूर्णवाद सहकारी पतपेढी मंगलमूर्ती पतपेढी व मैत्री प्लॉटर्सच्या दोन पतपेढी दोन मालमत्तांना अमळनेर नगर परिषदेच्या भरारी वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी सील लावले असून त्यामुळे थकाबाकीदार असलेल्या मालमत्ता धारकांच्या उरात धडकी भरलेली आहे.
या पतपेढ्यांकडे सुमारे 22 लाख 50 हजाराची थकबाकी असल्यामुळे केलेल्या कारवाईच्या व भरारी पथकाच्या नळ कनेक्शन बंद करणे मालमत्ता सील करणे अशा कामगिरीमुळे आज रोजी पाच लाखाची वसुली झाली आहे. नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी व दुकान भाडेपोटी थकीत रकमा त्वरित भरून अमळनेर नगर परिषदेत सहकार्य करावे व आपणावर अशा जप्तीची कारवाईची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे. मंगळवारी विशेष वसुली मोहीम नगरपरिषद वसुली वार्ड ५/६ या भागात राबविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *