अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथे तीन ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडे आठ हजार रुपयांची देशी व गावठी हात भट्टीची दारू नष्ट केली. या दोन्ही कारवाईत सुमारे 8 हजार 760 रुपयांची देशी व गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे.
याप्रकरणी तीन जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील सावखेडा येथे देशी व गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सावखेडा येथील वैदू वाडा भागात राहणाऱ्या बाबू मारुती वैदू याच्या घराच्या आडोश्याला सुमारे 1200 रुपयांची गावठी दारू आढळून आली. ती त्याच्याकडून जप्त करण्यात आली. तर त्याच भागात राहणारा रतन मल्लू वैदू हा घराच्या आडोश्याला असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये विना परवानगी देशी दारूच्या बाटल्या बाळगून विक्री करतांना आढळून आला. त्याच्याकडुन 6 हजार 160 रुपयांच्या 88 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 400 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील,सुनील जाधव, महिला पोलीस कर्मचारी नजिमा पिंजारी आदींच्या पथकाने केली असून दोन्ही जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.