आ.सौ स्मिता वाघ यांच्या निधीतून शासनमान्य ग्रंथालयांना मिळाली बौद्धिक विकासाची साधन सामग्री..अमळनेर(प्रतिनिधी)-भौतिक विकासासोबत बौद्धिक विकास देखील तेवढाच महत्वाचा असून यासाठी वाचन संस्क्रुती हि टिकलीच पाहिजे असे मत आ सौ स्मिताताई वाघ यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित भव्य ग्रंथ वितरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
आमदार सौ. स्मिताताई वाघ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत अमळनेर मतदार संघ व अमळनेर तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयांना आमदार निधीतून विपुल अशी ग्रंथसंपदा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आली,यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,उद्योगपती विनोदभैया पाटील,जेष्ठ नेते रामभाऊ संदान- शिव,प स सभापती वजाबाई भिल,श्याम अहिरे,मार्केट संचालक पावभा पाटील,हरी भिका वाणी,प्रफुल्ल पवार,संदीप पाटील, विजय लांबोळे, हिरालाल पाटील,जिजाब पाटील,महेद्र बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.वाघ यांनी या उपक्रमाद्वारे गांवातील तरुणांनी वाचन संकृतीवर अधिकाधिक भर देऊन स्व-विकास साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर माजी आमदार कृषिभूषण पाटील यांनी आ.वाघ राबवीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम जरी लहान वाटत असला तरी भविष्यात तालुक्याच्या विकासात मोलाची भर टाकणारा असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी या उपक्रमाद्वारे आजकाल वाचन संस्कृतीपासून दूर गेलेला गांवातील तरुण पिठी वाचन संकृती सोबत जुळविण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,आ सौ वाघ यांनी पुढील टप्प्यात राहिलेल्या ग्रंथालयांना ग्रंथसंपदा मंजूर करण्याचे आश्वासन दिले.