अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर येथील निवृत्त उपप्राचार्य प्रा. एन. के. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी ब्रह्म वृद्धांच्या मंत्र घोषात कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी देवीच्या जय घोषात अष्टमीच्या दिवशी शाकंभरी देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त भावपूर्ण व भक्तिमय वातावरणात शतचंडी महायाग करण्यात आला. यास भाविकांचा प्रतिसाद मिळाला.
त्यात देवी अथर्वशीर्ष , अनुष्ठान, स्थापित मंडल पूजन, अग्नि मंथन, विशेष हवन , बलिदान इत्यादी विधिवत पूजा संपन्न झाली. दिनांक 1 जानेवारी 23 रोजी शतच डी महायागास पूर्णाहुती देऊन भक्तिमय वातावरणात समारोप झाला. यानिमित्ताने सुमारे दोनशे भाविकांनी महाप्रसादाचा व भोजनाचा लाभ घेतला. या यागाचे मुख्य आचार्य घनपाठी वेदमूर्ती भागवताचार्य वेदाचार्य केशव शास्त्री पुराणे यांच्यासह 14 पुरोहितांनी यागाचे पौरोहित्य केले. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला व मोठ्या संख्येने उपस्थिती होते.