अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे चार जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे उमेश काटे, रामदास शेलकर (अमळनेर) या तीन व्यक्तींसह अमळनेर महिला मंच या संस्थेचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता.२०) दुपारी चारला येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार आहे.