अमळनेर (प्रतिनिधी) कोंडाजी व्यायाम शाळा पैलाड यांच्या सहकार्याने यंदाही मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कुस्त्यांचची दंगल झाली. दिग्गज पहेलवांनी प्रतिस्पर्धाना धुळ चारत विजय मिळवला.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, बबली पाठक, सुरेश पाटील के. डी. पाटील, प्रताप शिंपी, पो.शरद पाटील, शब्बीर पहिलवान, रावसाहेब पहिलवान, बाबु पाटील, भरत पवार, पाटील आदी उपस्थित होते. पंच म्हणून राजु पहेलवान, विठ्ठल पहेलवान यांनी काम पाहिले. आयोजन मा. नगरसेवक संजय कौतिक पाटील,संजय भिला पाटील, नेरंद्र पाटील, सुनील विजय पाटील, मनोज पाटील, भोला टेलर, बबलू मिस्तरी, तसेच कोंडाजी व्यायम शाळेचे कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. दंगलीत चाळीसगाव, धुळे, मालेगाव, धरणगाव कासोदा भुसावळ, येवला, कन्नड, नंदुरबार आदी बाहेरगावातील पहेलवानांनी हजेरी लावली.बक्षीस म्हणून भांडी व १०० से ५००० हजारांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या होत्या
यांनी केल्या चारीह मुंड्या चित
भैय्या पहेलवान (चाळीसगाव), सागर पहेलवान (येवला), संदीप पहेलवान (गोंडगाव), संदीप पहलवान (धरणगाव), पवन पहेलवान (अमळेनर), कल्पेश विसावे पहेलवान (धरणगाव), आदी स्पर्धेत विजयी झाले.