प्रताप महाविद्यालयाचे पराग पाटील बालिश उत्तरे देतात;तर प्राचार्यांनी ठेवले कानावर हात…

चेअरमन,संचालक मंडळ कारवाई का करत नाही..?अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर प्रताप महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचे घटनेला १५ दिवस उलटून देखील कुठलीही कारवाई, गुन्हा दाखल नाही राज्यभर नामांकित व न्याक प्रमाणीत या महाविद्यालयात मुले, मुली, सुरक्षित आहेत का..? महाविद्यालयाचे रॅगिंग समिती प्रमुख पराग पाटील यांना खबरीलाल ने रॅगिंग बाबत विचारणा केली असता त्यावर ते म्हणाले की ” विद्यार्थी मस्करी करत होते व तसा काही प्रकार घडलेला नाही ते मित्र आहेत, तरी आम्ही गठीत केलेली समिती द्वारे चौकशी करू’अशी बालिश उत्तरे देतात आणि पालकांनी जाब विचारला तर तक्रारदार व पालकांना परत पाठवत असतात, तर या बाबतीत प्राचार्य ज्योती राणे यांनी कानावर हात ठेवले आहेत, खा.शी.चेअरमन नीरज अग्रवाल कोणतेही पाऊल उचलत नाही म्हणून विद्यार्थी वाऱ्यावर असून रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थी मागे कुणाचा वरद हस्त आहे की गुंडांना ते भितात.? अशी शंका विचारली जात आहे. व पुन्हा महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९
४.रॅगिंग करण्याबद्दल शास्ती.- जी कोणी, कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा तिच्याबाहेर प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या रॅगिंग करत असेल, त्यात भाग घेत त्यास अपप्रेरणा देत असेल, किंवा त्याचा प्रचार करत असेल तर, त्यास अपराधसिद्धीनंतर,दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल आणि दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची देखील शिक्षा होण्यास ती पात्र असेल.
६.विद्यार्थ्याला निलंबित करणे.-(१) जेव्हा कोणताही विद्यार्थी किंवा यथास्थिती,आईवडील,किंवा पालक,किंवा शैक्षणिक संस्थेचा शिक्षक,शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडे रॅगिंगची लेखी तक्रार करील तर, त्या शैक्षणिक संस्थेचा प्रमुख,पूर्वगामी तरतुदींना बाध न आणता,तक्रार मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत तक्रारीमध्ये नमूद केलेल्या प्रकरणाची चौकशी करील आणि जर, प्रथमदर्शनी, ती खरी असल्याचे आढळून आल्यास,अपराधाचा आरोप असलेल्या विद्यार्थ्याला निलंबित करील आणि ती शैक्षणिक संस्था ज्या क्षेत्रा मध्ये असेल त्या क्षेत्रावर अधिकारीता असलेल्या पोलीस ठाण्याकडे तक्रार पुढील कार्यवाहीसाठी त्वरित पाठवतील.
संस्था,प्राचार्य ने कारवाई न केल्यास…..
७.अपप्रेरणा दिल्याचे मानणे.- रॅगिंगची तक्रार केली असताना,शैक्षणिक संस्थेचा प्रमुख कलम ६ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने कारवाई करण्यात कसूर किंवा हयगय करील तर,रॅगिंग सारख्या अपराधाला अशा व्यक्तीने अपप्रेरणा दिल्याचे मानले जाईल.आणि अपरासिद्धीनंतर कलम ४ मध्ये तरतूद केल्याप्रामणे तिला/त्याला शिक्षा करण्यात येईल.

महाराष्ट्र रॅगिंग कायद्यानुसार विद्यार्थ्यांची किंवा पालकांची तक्रार दाखल होताच तातडीने निपक्ष चौकशी करावी आठवडा होणेचे आत प्राचार्य अथवा प्राध्यापक यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा परंतु महाविद्यालय प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने सर्वच वर्गात दहशत पसरली आहे.असे अनेक पर्याय असून देखील रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना साधी शिक्षा करण्याचे धाडस देखील महाविद्यालय प्रशासन दाखवू शकले नाही.
रॅगिंग करणारा त्यांचे संबंधित जवळचा मुलगा आहे म्हणून टाळले जात आहे की ते मोठे गुंड असल्याने त्यांना महाविद्यालयातील हे सर्वच भितात अशी शंका विचारली जात आहे.
असे असतांना आपला पाल्य सुरक्षित नसल्याची भीती पालक वर्गात निर्माण झाली आहे.
चेअरमन नीरज अग्रवाल रॅगिंग समिती प्रमुख पराग पाटील व प्राचार्य ज्योती राणे यांना ‘विद्यार्थ्यांबद्दल खरोखर गांभिर्य असेल तर त्यांनी तातडीने अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करावा अन्यथा या तिघा महाशयांविरोधात पालक व विद्यार्थी रस्त्यावर येतील व आणि यांच्यावरच गुन्हा दाखल करतील असा इशारा महाविद्यालयातील काही विद्यार्थीसह असंख्य पालकांनी ‘खबरीलाल’ ला सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *