अमळनेर (वर्धापन दिन विशेष) आपल्या समाजातील काही लोक अशिक्षित, अनाडी व शासकीय नियमाबबत अज्ञान असल्याने शैक्षणिक कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासह समाजाच्या समस्यांचे निस्वार्थ निराकारण करण्याचे काम विकी-विशाल जाधव या दोन्ही बंधूंकडून केले जात आहे. त्यांचे काम हे हँसाच्या जोड्यालाही लाजवेल, असेच असून त्यांनी समाजसेवेचा उचलेला विडा एक दिवस त्यांना उंचपताळीवर नेणार आहे.
विकी-विशाल यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला असता अखिल भारतीय वाल्मीक मेहतर समाजाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असताना विकी जाधव यांनी वाल्मिकी मेहतर समाजाचे अधिवेशन नागपूर येथे बोलावले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना अधिवेशनाला आमंत्रित करून समाजासाठी स्वतंत्र आरक्षण देण्याचे साकडे घातले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाही त्यांनी आरक्षणासाठी साखळे घालून समाजासाठी त्यांचा लढा सुरूच ठेवला आहे. आपल्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी तथा विविध बाबींसाठी जातीचे दाखले काढता येत नव्हते. विविध कागदपत्रे जुने पुरावे गोळा करताना अडचणी येत होत्या म्हणून त्यांनी उपविभाग अधिकारी अजय मोरे यांची भेट घेऊन समाजातील सर्व प्रकरणे एकत्र आणून पूर्तता केली व एकाच वेळी ६८० जातीचे दाखले मिळून दिले होते. मेहतर समाजाचे आराध्य दैवत गोगादेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त छडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. मात्र ज्याप्रमाणे गोगादेव महाराजांनी जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व समाज एकत्र आनंदाने नांदण्यासाठी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे विकी व विशाल दोन्ही बंधू दरवर्षी सर्व समाजातील व्यक्तींना घेऊन गोगादेव उत्सव साजरा करतात. त्याचप्रमाणे सर्व धर्म समभावाची भावना त्यांच्या अंगी स्पष्टपणे जाणवते. एका वर्षी दुष्काळी परिस्थितीने तापी नदीला पाणी नव्हते आणि अंध गणेश भक्तांनी सावखेडा येथील तापी नदीच्या पुलावरून हजारो भल्या मोठ्या मूर्ती नदीत फेकल्याने मूर्ती खंडित होत होत्या. मूर्तींची विटंबना आणि हे दृश्य पाहून तत्कालीन उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांचे मन हे लावले होते. त्यांनी आवाहन करता विकी व विशाल जाधव यांनी कसलाही विचार न करता जेसीबी ट्रॅक्टर आणि ४० कामगारांचा ताफा घेऊन नदीमध्ये मूर्तींचे शास्त्रोतक विसर्जन केले होते. नदीत खड्डे खोदून जमिनीखालील पाण्यात त्यांची विसर्जन केले. यासह शिवजयंती, आंबेडकर जयंती, सप्तशृंगी माता उत्सव आदी उत्सव त्यांचे मोठे योगदान असते. दरवर्षी सप्तशृंगी यात्रेच्या वेळी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी ट्रक भर किराणा, खाद्यपदार्थ, थंडपेय, पाणी बाटल्या घेऊन ते अमळनेरपासून धुळे, मालेगाव वनीगड या मार्गावर अन्नदान करतात. विविध धर्म जातीचे भंडाऱ्यांना मदत केली आहे. दिवाळीत तीन हजार गरीब लोकांना फराळ वाटप करतात. भुसावळ येथील वृद्धाश्रमात बांधकामासाठी मोठे योगदान दिले आहे. खळेश्वर महादेव मंदिर, धार येथील गणपती मंदिर, मंगरूळ जिल्हा परिषद शाळा, किरकोळ दुरुस्ती आणि ठिकाणी स्वखर्चाने रस्त्यांची खड्डे बुजवणी, दुरुस्तीसाठी वाळू, सिमेंट मुरूममध्ये योगदान दिले आहेत. हिवाळ्यात दीडशे ते २०० गरीबांना उपचार व कांबळ वाटप करून वाढदिवसानिमित्त आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना भोजन देतात. शहराच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी अद्यावत करणे, बांधकाम सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी मदत केल्यानेच नुकत्याच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी विशाल जाधव यांचा सत्कार केला. गांधलीपुरा भागातील अजय बिराडे नावाच्या एका तरुणाच्या अपघातामुळे गंभीर दुखापत झाल्याने जातीपातीच्या विचार न करता विकी जाधव व विशाल जाधव दोघे बंधूंनी दवाखान्यासाठी खर्च करून लाखोंची बिल माफही करून आणले होते. राष्ट्रीय कार्यातही त्यांचा सहभाग असू देशहित राष्ट्रप्रेम जपून ते दरवर्षी शहरातील सेवानिवृत्त सैनिक यांना सैनिकांना मदत करत असतात. राष्ट्रभक्तीवर कार्यक्रमासाठी मदत करतात.ते आपल्या रोशनी ट्रेडर्सच्या माध्यमातून रेती, सिमेंट मुरून, दगड लोखंड व या बांधकाम व्यवसायात उतरले आणि उत्कृष्ट गुणवत्ता वजन याची गुणवत्ता राखली आहे. समाजात देखील त्यांनी आपले संघटन मजबूत केले आहे.