मारूतीच्या आशिर्वादाची खंबीर ढाल, लोकांना सेवा देतोय भद्रा प्रतीक मॉल

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) आईवडिलांचा आशिर्वाद आणि श्रीराम भक्त हनुमानजीवर नितांत श्रद्धा असल्यानेच आज व्यवसाया भरभराटी आली आहे. यातून वेळ काढत राजकारण आणि समाजिक कामातून गोरगरीबांचे सेवा करीत असताना हनुमानजीच्या आशिर्वादाची ढाल खंबीरपणे पाठीशा आहे, म्हणूनच हे वैभव आणि यश असल्याचे प्राताप छबुलाल साळी सांगतात.
प्रताप साळी म्हणाले, पैलाड येथे किराणा दुकानापासून व्यवसायाला सुरुवात केली. समाजसेवेचे व्रत वडिलोपार्जित आजी आजोबा वडिलांपासूनच मिळाले आहे. श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह, इलेक्ट्रॉनिक फर्निचर आदी विविध व्यवसाय करीत आहेत. तसेच शेती व्यवसायातही लक्ष घातले आहे. वडील स्वर्गीय छबुलाल देवाची साळी हे माजी नगरसेवक होते. त्यांनी १९६५ पासून तीन पंचवार्षिक पैलाड भागातून नगरसेवक म्हणून सेवा केली. त्यांच्याच पुण्याईने मी १९९१ ला नगरसेवक झालो. तर पत्नी १०९६ मध्ये नगरसेविका झाली. वडील, आईवडिलांच्या आर्शिवादाने व्यवसायात भरभराटी आहे. यामुळे मोठा व्यवसायिक आणि उद्योजक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. वयाच्या १८ या वर्षीच वडिलांचे छत्र हरवल्याने जबाबदारी वाढली. परंतु भाऊ दीपक साळी व आत्या बहिणी यांच्या हिमतीने अडचणींवर मात केली. त्यात वडिलांची पुण्याई जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर आज उद्योजक व प्रतिष्ठित नागरिक बनू शकलो. राजकारण व व्यवसायात खूप अडचणी आल्यात. परंतु त्यावर एकत्रित कुटुंब संघटितपणे लढलो. संकटावर मात केली. आमचे श्रद्धास्थान असलेले हनुमानजीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीवर आहेच कुटुंबाची मुलाची अशी साथ मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *