अमळनेर (वर्धापन दिन विशेष) मुडी विविध कार्यकारी सोसायटीतून बिनविरोध निवडून येत राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर अमळनेरात येऊन सामाजिक कार्याला वाहून घेतल्याने नगरसेविका म्हणून संधी मिळाली. यातून वॉर्डातील जनतेला सर्व मुलभूत सुविधा मिळून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे नगरसेविका चे पती योगराज राजेश संदानशिव दिसतात.
आपला राजकीय आणि सामाजिक प्रवाल उलगडताना नगरसेविका चे पती बाळासाहेब उर्फ योगराज चंदनशिव सांगतात, मुळगाव मुडी आहे. आपल्या राजकीय कारकीर्दचा श्रीगेशाही मुडी विकास सोसायटीतून केला. यात बिनविरोध निवडून आलो. त्यानंतर विकास सोसायटीत बिनविरोध व चेअरमन पदावर निवड झाली. तेव्हापासून राजकीय वाटचाल सुरू आहे. वडिलांची इच्छा असल्याकारणाने राजकारणात जाण्याचे ठरवले. वडील व मोठ्या भावांनी यासाठी प्रेरणा दिली. मला समाजसेवेची आवड होती म्हणून मी हे क्षेत्र निवडले. कुटुंबात आई, पत्नी, मुलगा व दोन मुले आहेत. आई निवृत्त शिक्षिका आहे. पत्नी जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षिका आहे. मुलगा ही शाळेत नोकरीला आहे. दोन मुली पुण्याला शिक्षण घेतात. प्रत्येक कार्यात त्यांचे मला मोलाचे सहकार्य मिळते. कोरोनाच्या काळात वॉर्डामध्ये फवारणी केली. वॉर्डातील लोकांना कोरोनाच्या काळात ग्रामीण रुग्णालयातून मदत औषधे मिळून दिली गोशाळेमार्फत त्यांना जेवणाचे वाटपही केले. अशा संकाटाच्या काळात लोकांना मदत केल्याचे मोठे समाधान आहे.