अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील दोन जणांना शहरात चोरून लपून सट्टा घेतांना पकडले आणि त्यांच्याकडून ६ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने केली त्यात नारायण डिगंबर पाटील व प्रल्हाद संतोष पाटील हे चोरून लपून सट्टा घेतांना आढळून आल्याने त्यांना पकडण्यात आले याबाबत अमळनेर पोलिसात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी दत्तात्रय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.