आ.सौ स्मिता वाघ यांच्या निधीतून शासनमान्य ग्रंथालयांना मिळणार विपुल ग्रंथसंपदा,ग्रंथालय वैभव संपन्न करण्याचा प्रयत्न…अमळनेर-शहरात भव्य ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन उद्या रविवार दि १४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले असून या सोहळ्यात आमदार सौ. स्मिताताई उदय वाघ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत अमळनेर मतदार संघ व अमळनेर तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयांना आमदार निधीतून विपुल अशी ग्रंथसंपदा ग्रंथ भेट म्हणून दिली जाणार आहे.आ सौ वाघांच्या या उपक्रमामुळे सर्व ग्रंथालय वैभवसंपन्न होणार आहेत.
आजच्या पिढीत वाचन चळवळ बळकट व्हावी,व समाजातील वाचकांना विविध विषयांवरचे जसे कथा-कादंबरी,स्पर्धा परीक्षा, बालसाहित्य, विज्ञान साहित्य, मनोरंजन इत्यादी विविध प्रकारचे ग्रंथ साहित्य,वाचनालयामार्फत उपलब्ध व्हावे यासाठी आ सौ वाघ यांची धरपड असून आपल्याकडील प्रत्येक शासकीय ग्रंथालय विविध पुस्तके व ग्रंथानी वैभव संपन्न करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे, आतापर्यंत त्यांनी मतदार संघातील तब्बल 80 वाचनालयांना सुमारे तीस लाख किमतीची मौल्यवान ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिलेली आहे.व आता पुन्हा दुसऱ्या टप्प्यात अनेक ग्रंथालयाचा समावेश करून त्यांना या सोहळ्यात ग्रंथ वितरण करण्यात येणार आहे.या स्तुत्य उपक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.पूर्वी ग्रामिण भागातील जी ग्रंथालये ग्रंथाअभावी ओस पडली होती तेथे वाचनीय साहित्य उपलब्द झाल्याने वाचकांचा ओढ व आवड वाढली असून पुस्तके घेण्यासाठी नंबर लागताना दिसू लागले आहे,व हि वाचनाची चळवळ आ सौ वाघांच्या प्रेरणेने सुरु झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवारी सकाळी ९ वा बाजार समितीत होणाऱ्या ग्रंथ वितरण सोहळ्यास आ सौ स्मिता वाघ,जिल्हाध्यक्ष उदय वाघ व मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून याप्रसंगी सर्व ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.