अमळनेर(प्रतिनिधी)-अमळनेर तालुक्यातील म्हसले ग्रामपंचायती वर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध करीत सरपंचपदी भाजपाचेच रविंद्र अर्जुन पाटील यांची निवड झाली आहे.सदर निवडीबद्दल आ सौ स्मिता वाघ व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस हिरालाल पाटील तसेच ग्रा प सदस्य भरत पाटील,वना साळुंखे,सौ पुष्पबाई पाटील,अशोक वाघ,दिनकर पाटील,कैलास पाटील,विकास पाटील,रवींद्र पाटील, लहू पाटील उपस्थित होते.दरम्यान सुमारे अडीच वर्षांपूर्वी म्हसले ग्रा.प.ची निवडणूक झाल्यानंतर सरपंच पद अडीच अडीच वर्षे देण्याचा निर्णय झाला होता,मावळत्या सरपंचांनी आपला अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर आता पुढील अडीच वर्षांसाठी रविंद्र पाटील यांना संधी मिळून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यातील अनेक ग्रा.प. वर भाजपाचेच सरपंच विराजमान असून त्यात आता म्हसले ग्रा.प.ची देखील वाढ झाली आहे.